हिंदूंना नष्ट करण्याची वल्गना करणारा मौलवी आता माफी का मागतोय?

120

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील एका मौलवीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये त्याने हिंदूंना नष्ट करण्याची शपथ घेतल्याचं दिसत आहे. फारुख असे या मौलवीचे नाव आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही तो या व्हिडिओत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, देशभरात मौलवी फारूख विरोधात संतापाची लाट उसळली. त्यानंतर मौलवीने माफी मागितली आहे. लोकांच्या रोषाला आणि कायदेशीर पेचांना घाबरून माफी मागणाऱ्या या मौलवीने आपण कोणत्याही समाजाच्या नव्हे, तर सरकारविरोधात वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.

मौलवीचे स्पष्टीकरण

या व्हिडिओनंतर कायदेशीर कारवाईच्या भीतीने मौलवीने आणखी एक व्हिडिओ जारी करून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. काश्मीर फाईल्स नावाने बनवण्यात आलेल्या चित्रपटात काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे समाजातील ऐक्य बिघडते. माझ्या धार्मिक भाषणात मी सरकारकडे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आमचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. त्यापेक्षा मी म्हणतो काश्मिरी पंडित हे जम्मू-काश्मीरची शान आणि अभिमान आहेत. त्यांच्याशिवाय हे राज्य अपूर्ण आहे. कोणत्याही धर्माबद्दल माझे कोणतेही विधान नाही. माझे विधान समजून घेण्यात चूक झाली. माझे धार्मिक भाषण कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधात नव्हते, तर सरकारच्या विरोधात होते, असं स्पष्टीकरण मौलवींनी दिले आहे.

( हेही वाचा: देशातील ‘या’ राज्यांमध्ये हिंदूंनादेखील मिळणार ‘अल्पसंख्याक’ दर्जा? )

मौलवीचे आधीच्या व्हिडिओतील विधान

द काश्मीर फाईल्स हा चित्रपट बंद व्हायला हवा. आम्ही 800 वर्षांपासून तुमच्यावर सत्ता गाजवली आहे. ती तुम्ही 70 वर्षांत मिटवण्याचा प्रयत्न करत आहात. अगदी अशाचप्रकारे काश्मीरमधून काश्मिरी हिंदुंचे अस्तित्व संपवण्यात आल्याचे या मौलवींनी आपल्या व्हिडिओत म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.