अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. पण, असं असतानाही अजूनही अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवली शहराच्या विविध भागांत अल्पवयीन मुले दुचाकी चालवत आहेत. त्यामुळे जी अल्पवयीन मुले दुचाकी चालवतात त्या मुलांच्या पालकांवर कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.
त्यामुळे नियमांचा भंग होतो
18 वर्षांखालील अनेक मुले सर्रास दुचाकी चालवत असल्याचे गस्तीवरील वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या अल्पवयीन मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना मुलांकडून होत असलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यात आली होती. सुरुवातीला अशा मुलांना समज देऊन सोडण्यात येत होते.
( हेही वाचा :पोलिसांसाठी आनंदाची बातमी! पोलिसांच्या रजांमध्ये झाली ‘एवढी’ वाढ )
म्हणून पालकांवर होणार कारवाई
सोमवारपासून डोंबिवली वाहतूक पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई सुरू केली जाणार आहे, असे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी सांगितले. पालक नोकरीनिमित्त घराबाहेर गेले, की दुचाकीची चावी घेऊन मुले घराबाहेर मजा करण्यासाठी गाडी घेऊन जातात. यातून अनेक अपघात होतात, असे चौकशीतून निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community