#TheKashmirFiles चित्रपटानंतर काश्मिरी पंडित जमणार काश्मिरात! काय आहे निमित्त?

185

काश्मिरी पंडीत पुन्हा एकदा काश्मीरमध्ये एकत्र येणार आहेत. निमित्त आहे काश्मीर येथे साजरे होणारे नवरेह अर्थात नवीन वर्ष! 2 एप्रिल रोजी नवीन वर्षाच्या निमित्ताने हरि पर्वत येथे मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित एकत्र जमणार आहेत. त्यानंतर काश्मिरी पंडित तेथील शारिका मंदिरात पूजाअर्चा करणार आहेत. त्यावेळी ते काश्मीरमध्ये त्यांची पुन्हा घरवापसी व्हावी, म्हणून प्रार्थना करणार आहेत. यंदाच्या वर्षी जेके पीस फोरमच्या वतीने नवीन वर्षाच्यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध भागात राहणारे काश्मिरी पंडित येणार आहेत. या कार्यक्रमाला भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी आणि शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी हेही सहभागी होणार आहेत.

जेके पीस फोरमद्वारे कार्यक्रमाचे आयोजन

90च्या दशकात काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. हा अत्याचार ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आला. यामुळे अवघ्या देशभरात सध्या हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत २ एप्रिल रोजी नवरेहच्या निमित्ताने २ एप्रिल रोजी जेके पीस फोरमद्वारे आयोजित कार्यक्रमात काश्मिरी पंडित पुन्हा एकत्र येतील, त्या अनुषंगाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याअंतर्गत काश्मीरमधून विस्थापित झालेले आणि देशाच्या विविध भागात स्थायिक झालेले काश्मिरी पंडित पुन्हा एकदा हरि पर्वतावर एकत्र येणार आहेत, अशी माहिती आयोजक सतीश महालदार यांनी दिली.

गेल्या 32 वर्षांत पहिल्यांदाच सर्व पक्षांचे खासदार एकत्र येऊन काश्मीरचा सण साजरा करणार आहेत. या कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री, शिलाँगचे राज्यपाल यांना लेखी निमंत्रण पाठवले आहे. पण संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे आणि पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी आणि शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी उपस्थित राहणार आहेत.
सतीश महालदार, जेके पीस फोरम

(हेही वाचा #The Kerala Story: इस्लामिक राज्य बनवण्याचे षडयंत्र? कुठे गायब झाल्या ३२ हजार मुली?)

शेर-ए-काश्मीर पार्क येथे स्नेह मिलन

हरि पर्वतावरील शारिका मंदिरात पूजेनंतर सर्व काश्मिरी पंडित आणि हिंदू शेर-ए-काश्मीर पार्कमध्ये जमतील. तिथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात राजकीय पक्षाचे नेतेही सहभागी होणार आहेत.

नवरेह हे जम्मू-काश्मीरचे नवीन वर्ष

दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवरेह साजरा केला जातो. शपथ ऋषी संवतानुसार यंदा ५०९८ नवरेह साजरा होणार आहे. काश्मीरमध्ये साजरा केला जाणारा नवरेह सण महाराष्ट्र, गोवामध्ये गुढीपाडवा, तर आंध्रप्रदेश, कर्नाटकमध्ये उगादी म्हणून साजरा केला जातो. हे हिंदू नववर्ष म्हणून साजरे केले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.