कुर्ल्यातील क्रिटीकेअर रुग्णालयात मुंबईतील बारावे अवयदान पार पडले. ४८ वर्षीय मृत पुरुषाकडून मरणोत्तर अवयवदान झाल्यानंतर दोन मूत्रपिंडे, फुफ्फुस आणि यकृत दान केले गेले. या अवयदानातून चार गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले.
मेंदूत रक्तस्त्राव झाला होता
या पुरुषाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल केले गेले. त्याला तातडीने कृत्रिम श्वासोच्छवास दिला गेला. रुग्णाच्या सिटी स्केन तपासणीत त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. रुग्ण जगण्याची आशा नसल्याचे आम्ही कुटुंबियांना दिली. त्याचवेळी आम्ही कुटुंबियांना अवयव दानाची माहिती दिली, अशी माहिती कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी म्हणाले. रुग्णाला रविवारी मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर अवयव दानाची माहिती मिळाल्यानंतर अखेर कुटुंबियांनी अवयव दानाला संमती दिली.
Join Our WhatsApp Community