कोरोनानंतर वाढताहेत ‘हे’ आजार

159

पुण्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, कोविड होऊन गेलेल्या काही नागरिकांमध्ये त्वचेचे आजार बळावले आहेत. योग्य उपचारांनी हे आजार बरे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेकांमध्ये केस गळतीचे आणि नागीण (हर्पीज लाबियालिस) होण्याचे प्रमाण वाढले आहे.

तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

कोरोनाची तिसरी लाट ओसरली खरी, परंतु आता कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये अशक्तपणा जाणवत आहे. वेगवेगळ्या व्याधींचा त्रास वाढत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागीण या रोगाची लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले आहे. हे संक्रमण ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येत आहेत. या रुग्णांमधील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने रुग्णांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

( हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे सोडणार १८२ उन्हाळी विशेष गाड्या )

एचएसव्ही नागीण प्रकारापेक्षा हर्पीज जोस्टर हा नागिणीचा प्रकार कोरोनानंतर जास्त बघायला मिळाला आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्टिरॉइड आणि अँटीव्हायरल औषधांच्या परिणामामुळे संधिवातासारख्या समस्या जाणवत आहेत. नागरिकांनी या समस्या जाणवल्यानंतर तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.