आता मुंबईतील ‘या’ 19 गर्दीच्या स्थानकांमध्ये होणार एकमजली स्टेशन!

173

मुंबई म्हटलं की गर्दी, स्वप्नाची नगरी, मुंबईची लाईफ-लाईन आणि गर्दीने खचाखच भरलेले रेल्वे स्थानकं डोळ्यासमोर येतात. याच मुंबईतून दररोज धक्काधक्कीचा प्रवास लाखो मुंबईकर करत असतात. याच प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे मुंबईतील वाढती गर्दी लक्षात घेता गर्दीच्या स्थानकांमध्ये आता एकमजली स्टेशन तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकल्पासाठी 947 कोटींची पुनर्विकास योजना मंजूर

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 947 कोटी रुपयांची पुनर्विकास योजना मंजूर करण्यात आली असून पुढील 16 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण होणार आहे. गर्दीची आणि गजबजलेली मुंबईतील प्रमुख 19 रेल्वे स्थानकांचा या प्रकल्पाअंतर्गत पुर्नविकास केला जाणार आहे.  मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प 3A चा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट लिंक – POS अंतर्गत 947 कोटींचा  हा पुनर्विकास प्रकल्प आहे.

(हेही वाचा – … तर हिंदू देवी-देवतांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही? न्यायालयानं ट्विटरवर व्यक्त केला संताप)

या 19 रेल्वे स्थानकांचा होणार पुर्नविकास

या प्रकल्पाअंतर्गत 19 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्यात येणार असून यामध्ये मध्य रेल्वेवरील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, नेरळ, शहाड, कसारा, जीटीबीएन, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या 12 स्थानकांचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, सांताक्रुझ, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई आणि नालासोपारा या सात स्थानकांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.