निधनाची बातमी कळताच जॅकी श्राॅफ यांनी गाठले कामगाराचे घर

116

चंदेरी दुनियेतील फिल्म अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या तरुणाच्या वडिलांचं निधन झाल्याचं समजताच पुणे जिल्ह्यातील चांदखेड येथील गायकवाड परिवाराच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहचले. सागर दिलीप गायकवाड हे जॅकी श्रॉफ यांच्या चांदखेड येथील फार्म हाऊवर काम करतात.

अगदी मुलाप्रमाणे दिला धीर

या कामगाराचे वडील दिलीप गायकवाड यांचं नुकतच अल्पशा आजाराने निधन झालं. याची माहिती कळताच जॅकी श्रॉफ हे गायकवाड कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी चांदखेड येथील घरी पोहचले. या भेटीमुळे गायकवाड कुटुंबाचे काहीसे दुःख नक्कीच हलके झाले असेल. जॅकी श्राॅफ हे  सागर गायकवाड यांच्या आज्जी तान्हाबाई गायकवाड यांच्या शेजारी बसून अगदी मुलाप्रमाणे त्यांनी या गरीब कुटुंबाला धीर दिला.

( हेही वाचा: १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात ३ हजार ६०३ पदांची भरती )

जॅकी श्राॅफ हे त्यातील एक

हे असं काहीतरी करण्याची जॅकी श्रॉफ यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा त्यांच्या कृतींनी पाहणाऱ्यांपुढे आदर्श प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळालं आहे. एक कलाकार संपत्तीनं श्रीमंत असतोच. पण, मनाची श्रीमंती नेमकी काय असते हे दाखवून देणारे मात्र कमी असतात. जॅकी श्राॅफ हे त्यातील एक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.