भारतीयांना परदेशी शिक्षणाची खूप ओढ आहे. त्यामुळे भारतातील लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र आता मायदेशात बसून परदेशी शिक्षण घेता येणार आहे. कारण, लवकरच हार्वर्ड, केंब्रिज आणि एमआयटी सारखी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरु करणार आहेत. इतकेच नाही तर, भारतातील आघाडीच्या शिक्षण संस्थांसाठीही सुमारे 15 देशांनी दारे उघडली आहेत.
पदवी प्रमाणपत्र द्यावे लागणार
विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार म्हणाले की, देशात येणा-या परदेशी विद्यापीठांना अभ्यासक्रम ठरवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल. विद्यापीठांच्या स्वायत्ततेमध्ये अनुदान आयोग हस्तक्षेप करत नाही. भारतीय विद्यापीठांमध्येही अभ्यासक्रम ठरवण्यासाठी अभ्यास मंडळे असतात. त्याचप्रमाणे परदेशी विद्यापीठांनाही संपूर्णपणे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. मात्र त्यांना भारतीय विद्यापीठांप्रमाणे पदवीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याचे जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा :पवारांचं आडनाव आगलावे करा; सदाभाऊंची टीका )
भारतातील संस्थानांही परदेशातून ऑफर
भारतातील आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी यांसारख्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांनाही परदेशात कॅम्पस सुरु करण्यासाठी काही देशांनी ऑफर दिली आहे. भारतातील विद्यापीठांना परदेशात कॅम्पस सुरु करण्यास अंतिम स्वरुप देण्यासाठी इस्त्रोचे माजी अध्यक्ष डाॅक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community