‘हिजाब’ नक्की कोणाला हवाय?

143

कर्नाटक उच्च न्यायालयाने शालेय विद्यार्थिनींसाठी हिजाब घालून शाळेत किंवा परीक्षेला जाण्यास बंदी केली आहे; परंतु अद्यापही काही ठिकाणी हिजाबच्या अनुमतीसाठी आंदोलने चालू आहेत. काही हिजाबींनी परीक्षेला बसण्यास नकार दिला आहे. खरोखर हिजाबची सक्ती कोणाला हवी आहे, या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी एक अनुभव लिहित आहे.

रेल्वेतील 3 हिजाबी कन्यांशी संवाद

साधारणतः वर्ष 2017 ची ही गोष्ट आहे. मी भाग्यनगर (हैदराबाद) येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्याहून रेल्वेने निघालो. या प्रवासाच्या अंतर्गत हुबळी (कर्नाटक) या रेल्वे स्थानकावर तीन मुस्लिम विद्यार्थिनी आणि त्यांचे अब्बाजान (कदाचित आजोबा असावेत.) आमच्या रेल्वेत चढले. माझ्या अवतीभवतीच्या जागा या चौघांच्या असल्याने माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्याशी संवाद घडला.

या तीन कन्या अकराव्या वर्गात शिकत होत्या आणि भाग्यनगर (हैदराबाद) येथे कुठल्यातरी एका परीक्षेसाठी जात होत्या. त्यांचे पालक म्हणून त्यांच्यासोबत या कन्यांपैकी एकीचे नातेवाईक आले होते. या मुली त्यांना ‘अब्बाजान’ म्हणत होत्या. काळ्या रंगाचे हिजाब घातलेल्या तीन कन्या बोलक्या होत्या. त्यांच्यातील एकीने संपूर्ण वेशभूषा बुरख्याची केली होती; परंतु चेहरा मात्र मोकळा होता. मी त्यांना कुतुहलाने विचारले ‘हिजाब म्हणजे काय’ आणि ‘बुरखा म्हणजे काय ?’ त्यांच्यापैकी एकीचे वडील मजिदीमध्ये मौलाना असल्याने तिने विस्तृतपणे यासंदर्भातील इस्लाममधील माहिती सांगितली.

( हेही वाचा : … तर हिंदू देवी-देवतांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही? न्यायालयानं ट्विटरवर व्यक्त केला संताप )

मी तिला विचारले की, ‘तुला हे सगळं कसं माहीत ?’ तेव्हा तिने तिचे वडील मौलाना असून त्यांनीच तिला हे शिकवल्याचे सांगितले.

हिजाब आणि घुंघट यांवरील ‘गरम’ चर्चा !

मी म्हटले, ‘‘उन्हाळ्याचे दिवस आहे. मे महिना हा अत्यंत गर्मीचा काळ असतांना काळ्या रंगाचा स्कार्फ (हिजाब) घालून तुम्हाला गरम (उष्ण) होत नाही का ?’’ त्या वेळी तिघींनी सांगितले की, ‘यह हमारे मजहब का फैसला है ! इस लिए हिजाब को हमने अपनाया है ।’’ त्यांच्यापैकी एकीने पुढे सांगितले की, ‘आपके धरम में भी तो घुंघट डालते है । वैसाही यह हिजाब है ।’’ थोडक्यात तुमच्या आणि आमच्या धर्मातील शिकवण एकच आहे, हे सांगण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न होता!

मी त्यांना ‘घुंघटप्रथा भारतात कशी आली’, हे थोड्या विस्ताराने सांगतांना सुलतानी आक्रमकांनी हिंदु कन्यांवर केलेल्या अत्याचारांचे वर्णन केले. त्यांना मी ‘‘घुंघटप्रथा ही दहशतीमुळे आली. ती हिंदु धर्मात कधीच नव्हती. आमच्या सर्व देवी मां कधी घुंघट घालत नाहीत’’, हे सोप्या शब्दांत सांगितले.

मी घुंघटप्रथेसाठी इस्लामला दोष दिल्याने त्यातील एकीला राग आला आणि ती जरा रागावरूनच म्हणाली, ‘आपने झुठी कहानी बतायी । यह देश पहिले मुसलमानोंकाही था । गांधी और नेहरूने हमारे लोगों को पाकिस्तान में भेज दिया । त्यांची ही वाक्ये विद्यार्थी वयातील मुसलमानांच्या मनाचा शोध घेण्यासाठी पुरेशी होती !

‘हिजाब’ कोणाला हवा होता ?

अन्य दोघी आणि त्यांचे अब्बाजन मात्र कुतुहलाने संवाद ऐकत होते. मी त्यांना म्हणालो, ‘‘बर्याचदा आपल्याला कळलेली माहिती खरीच असते, असे नाही. त्यामुळे याचा विचार करू नका; पण तरीही मला असे वाटते की, तुमचे अब्बाजान सोबत आहेत; म्हणून तुम्ही एवढ्या उन्हात हा काळा स्कार्फ घातला असावा.’’ मी असे म्हणताच त्यांच्यातील एक मुलगी लाजली. तेवढ्यात त्यांचे अब्बाजान चर्चेत सहभागी होत म्हणाले, ‘मैने कोई मजबुरी नही की है । यह तो उनका खुदका फैसला है । दुसर्या मुलीनेही जरा ठासूनच सांगितले की, ‘यह हमारा खुदका फैसला है ।’’ तिसर्या मुलीने मात्र प्रांजळपणे सांगितले, ‘‘मुझे मेरे अब्बाने बताया है । 9 वी कक्षा तक हम नही पहनते थे ।’’

काही वेळाने गुंटकल नावाचे रेल्वे स्थानक आले. येथे 5 घंट्यांचा थांबा होता; कारण आमची मुख्य गाडी बंगळूरुला जाणार होती आणि आमचे भाग्यनगर (हैदराबाद)चे डबे दुसर्या रेल्वेला जोडले जाणार होते. गुंटकल स्थानकाला गाडी थांबल्यानंतर ते अब्बाजान उठले आणि या 3 कन्यांना म्हणाले, ‘‘मेरे पुराने रिश्तेदार यहा रहते है । मै 3 घंटे में वापीस आऊंगा । तब तक अपना ख्याल रखना ।’’ ते गाडीतून उतरल्याची निश्चिती होताच या तिन्ही ‘हिजाबी’ कन्या आपापल्या जागेवरून उठल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘भैय्या, हम 2 घंटों में बाजार होकर आते है । अब्बाजान आने के पहले ही आ जाऐंगे ॥’’

गुंटकल हे नगर अलंकार आणि सौंदर्यप्रसाधने यांसाठी प्रसिद्ध आहे. साधारणतः 2 घंट्यांनी या मुली पुन्हा रेल्वेत चढल्या. त्यांनी कर्णफुले, गळ्यातील माळा, काळ्या बिंदी, क्लिप आणि छोटे छोटे आरसे खरेदी केले होते. रेल्वेत चढल्यानंतर त्या तिघींनी ‘हिजाबी’ स्कार्फ काढून बाजूला ठेवले आणि ते अलंकार परिधान केले. त्या आरशांत पहात होत्या. त्या वेळी मी त्यांना हसत हसत विचारले की, ‘‘गुंटकल में यह शृंगारसाहित्य सस्ता मिलता है क्या ? तिघी एकसुरात म्हणाल्या, ‘‘बहुत सस्ता है ।’’ मी लगेच म्हटले, ‘‘पर इस्लाम में शृंगार जायझ (वैध) है क्या ?’’ माझा प्रश्न हा ऐकताच तिन्ही कन्या एकमेंकींकडे पाहून एकदम लाजल्या. त्यांच्यातील एकीने ‘‘नाही’’ म्हणण्याचे धाडस दाखवताच दुसरी म्हणाली, ‘‘भैय्या हमने यह सामान खरीदा है, ऐसे आप अब्बाजान को ना बताए ।’’ मी होकारार्थी मान डोलावली; कारण त्यांच्या विनंतीवरून ‘हिजाब नक्की कोणाला हवा होता’, या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले होते.

शृंगार हे स्त्रीचे नैसर्गिक कर्म आहे; परंतु ते नाकारून काळ्या स्कार्फमध्ये तिला गुंढाळणार्या प्रवृत्तीविषयी खरे तर स्त्रीमुक्ती चळवळ असायला हवी; पण हे आधुनिक स्त्रीमुक्तीवाल्यांना कोण सांगणार ?

– चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था, (7775858387)
Twitter : @1chetanrajhans

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.