“छत्रपती शिवाजी महाराज हेच लष्कराचे दैवत”- निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

130

शत्रूच्या मनात नेहमीच आपल्याविषयी भितीयुक्त आदर असला पाहिजे, आपल्या भ्याड शत्रूवर सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती करण्यास भारत मागे पुढे पाहणार नाही, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज हेच लष्कराचे दैवत असल्याचे लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितले. ते कॉलेज ऑफ क्लब लीडर्स या संस्थेच्या ठाणे येथील यावर्षीच्या तिसऱ्या सभेमध्ये “उरी द सर्जिकल स्ट्राईक २०१६” या विषयावर बोलत होते. निंभोरकर हे उरी ते बालाकोट सर्जिकल स्ट्राइक या प्रत्यक्ष हल्यात भाग घेतलेले सर्जिकल स्ट्राइक प्रमुख होते.

( हेही वाचा : प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली बनणार चार समित्या? )

“लम्होंने खता की ओर सदियोंने सजा पाई”

लष्करामध्ये शिस्त, आत्मविश्वास व अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसे नियोजन केले जाते, ते उरीच्या सर्जिकल स्ट्राईकचे उदाहारण देतानाच आपले लष्कर किती सज्ज, कर्तव्यदक्ष व जिगरबाज आहे, याची अनेक उदाहरणांसह निंभोरकर यांनी प्रचिती दिली. काश्मीरच्या आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांनी एक शेर ऐकवला “लम्होंने खता की ओर सदियोंने सजा पाई”. हा कार्यक्रम ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.