गेल्या सात वर्षांत बँक फसवणूक किंवा घोटाळ्यांमुळे भारताचे दररोज किमान 100 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बँक घोटाळ्यांचे मोठे आणि गंभीर परिणाम भारताला सध्या भोगावे लागत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली असून या घोटाळ्यांमुळे भारताचे रोज 100 कोटी रूपयांचे नुकासान होते असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
महाराष्ट्र या यादीत अव्वल स्थानावर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील डेटाच्या माहितीनुसार, या बँक घोटाळ्यांमधील एकूण रक्कमेमध्ये दर वर्षाला घट होत असली तरी भारताच्या तिजोरीचे दररोज 100 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र या यादीत अव्वल स्थानावर असून तिथे घोटाळ्यातील 50 टक्के पैशाचा समावेश आहे. पण, अर्थ मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, बँकिंग घोटाळ्यांसंदर्भात त्वरित अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दरवर्षी फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये मिळून सुमारे 2 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे बँक घोटाळे झाले आहेत. एकूणच 83 टक्के पैसा हा या आर्थिक घोटाळ्यांमध्ये आहे. या सर्व राज्यांमध्ये मिळून 1 एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2021 या काळात 2.5 लाख कोटी रुपयांचे बँकिंग घोटाळे समोर आले आहेत.
(हेही वाचा – शिवसेना, भाजप पुन्हा एकत्र येणार? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान)
मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँक घोटाळ्यांची आठ विविध प्रकारांमध्ये विभागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community