येड्यांच्या मागे लागली ईडी! सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल 

151

येड्यांच्या मागे ईडीची चौकशी लागलेली आहे. पण ज्यांच्याकडे शहाणपणा आहे, जे सज्जन आहेत. त्यांना येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात दिली आहे. सध्या महाराष्ट्रात मोठ मोठे नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर ईडीच्या छाप्यांचे सत्र सुरू आहे, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सत्तेसाठी पवारांजवळ गेले आणि पवारांनी गिळले 

शेतकऱ्यांची वीज कापायला आला, तर हातात दांडके असतील, त्याने सोलून काढले जाईल. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची वीज कापायला कोणी येत असेल, तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता दांडके असतील आणि त्याने सोलून काढले जाईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आता शेतकऱ्यांना ‘वीजबिल माफी’ द्यावी लागेल असे मत सदाभाऊंनी व्यक्त केले आहे. ‘पवारांच्या जवळ गेले, पवारांनी कधी गिळले, हे शिवसेनेला सुद्धा कळले नाही.’ सोलापुरातील युवा सेनेच्या मेळाव्यात काल भूम – परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली होती, त्यावर सदाभाऊ खोतांनी काव्यात्मक पद्धतीने प्रतिक्रिया दिली. सदाभाऊंनी काव्यात्मक पद्धतीने काढलेला शिवसेनेचा चिमटा ‘तानाजी सावंत यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीवर केलेली टीका म्हणजे त्यांच्या मनातील खदखद आहे. यंदाच्या अर्थशंकल्पातील 60% निधी राष्ट्रवादीला, 30% निधी काँग्रेसला आणि 15% निधी हा शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे ‘सत्तेसाठी हे पवारांजवळ गेले, पवारांनी कधी गिळले, हे शिवसेनेला सुद्धा नाही कळले,’ असं म्हणत सदाभाऊंनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.