शरद पवार होणार यूपीएचे अध्यक्ष?

129

सध्या भाजपला देशभरात पर्याय नाही. त्यामुळे मोदींना सत्तेवरून खाली उतरवणे २०२४ मध्येही अशक्य होणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एका बाजूला टीएमसीच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरी आघाडी उभारण्यासाठी तयारी करू लागल्या आहेत. सध्या युपीएच्या अध्यक्षपदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, त्यांच्या जागी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी चर्चा सुरु झाली आहे. तसा ठरावही शरद पवारांच्या उपस्थित संमत झाला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला ठराव मंजूर 

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह भाजप विरोधकांना मोठा फटका सहन करावा लागला, तर भाजपचा विजयाचा वारू पुन्हा एकदा चौफेर उधळल्याचे पहायला मिळाले. अशा वेळी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या यूपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मात्र यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे. आता ही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने थेट राजधानी दिल्लीत केली आहे. महत्वाची बाब म्हणजे खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत महत्वाचा ठराव मांडण्यात आला. या बैठकीला खुद्द शरद पवारही उपस्थित होते. यावेळी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यात यावे, असा ठराव सादर करण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात आता पुन्हा एकदा यूपीए अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा एसटी संपावर मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र)

संजय राऊतांनीही केलेली मागणी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी संयुक्त पुरोगामी आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले होते, एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी यूपीएचे पुनर्गठन व्हावे, असे म्हटले. इतकच नाही तर यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावे, असेही ते म्हणाले. राऊत यांनी या मुलाखतीत यूपीएच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, असेही राऊत यांनी म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.