मोदी सरकार आणणार ‘सुपर’ अ‍ॅप

120

मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी लवकरच सुपर अ‍ॅप लॉंच करणार आहे. या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना पीक, कापणीनंतरचे व्यवस्थापन, हवामान आणि बाजारातील घडामोडी यासंदर्भातील सर्व सुविधा एकाच जागी उपलब्ध करून देणे हा या अ‍ॅपमागील प्रमुख उद्देश आहे.

( हेही वाचा : युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर )

सर्व माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध

अलिकडे सर्वांकडेच स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असते यामुळेच मोदी सरकार हा अ‍ॅप लॉंच करण्याची योजना आखत आहे. कृषी मंत्रालय किसान सुविधा, एमकिसान, फार्म ओ पीडिया, पीकविमा, इफको किसान या सर्व अ‍ॅप्सचे मिळून एक सर्वसमावेशक अ‍ॅप लॉंच करणार आहे. अलिकडेच कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या अ‍ॅपच्या प्रगतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की हे सुपर अ‍ॅप  येत्या काही आठवड्यात लॉंच केले जाऊ शकते. शेतकऱ्यांना पीक उत्पादन आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी या सुपर अ‍ॅपचा उपयोग होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे. अशाप्रकारे बाजारपेठेपासून ते पीक विकासापर्यंतची सर्व माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.