उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव गडद होत असल्याने मंगळवारपासून राज्यातील बहुतांश भागांत सूर्याचा प्रकोप जाणवू लागला. राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद चंद्रपूरात झाली. चंद्रपूरात कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. मंगळवारी जगभरातील सर्वात जास्त कमाल तापमानात चंद्रूपूरात पारा तिस-या स्थानावर पोहोचला. अकोल्यातील कमाल तापमान या यादीत सातव्या स्थानावर होते. अकोल्यातील कमाल तापमान ४३.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले.
गेल्या दोन दिवसांपेक्षाही मंगळावारी राज्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान कमालीचे वाढल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील काही भागांत कमाल तापमान चाळीशीपार गेले. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, गरज असेल तरच दुपारच्या वेळेत घराबाहेर पडा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विदर्भात उष्णतेची लाट जास्तच प्रभावी झाल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशाने जास्त नोंदवले जात होते. चंद्रपूरातील सरासरी कमाल तापमान सरासरीच्याही तुलनेत ४.३२ अंशाने जास्त नोंदवले गेले होते. विदर्भाखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेच्या झळा तीव्र होत्या.
चाळीस अंशापुढे गेलेले जिल्हे
कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) – सरासरी पेक्षा जास्त तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- चंद्रपूर – ४३.४ —४.२
- अकोला — ४३.१ — ४.३
- वर्धा — ४२.४ —३.५
- सोलापूर – ४२.२ —३.३.
- जळगाव – ४१.८ —२.५
- ब्रह्मपुरी –४१.७ — ३.१
- चिपळूण – ४१.७ — ००
- अहमदनगर – ४१.७ —४.६
- मालेगाव – ४१.६—३.३
- नांदेड – ४१.६ —३.२
- परभणी – ४१.६ —३.१
- नागपूर — ४१.५ — ३.३
- वाशिम — ४१.५—०.४
- यवतमाळ — ४१.५—४
- गोंदिया — ४०.८ — २.७
- सांगली – ४०.३—२.४
जगभरातील पहिल्या तीन स्थानांवरील कमाल तापमानाची नोंद
पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर मळी या देशातील केईस आणि सीगऊ येथे कमाल तापमानाची नोंद झाली. केईस येथे कमाल तापमान ४४.४ अंश सेल्सिअस तर सीगऊ येथे ४३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
जगभरातील कमाल तापमानाच्या यादीत देशातील ही शहरे
राज्यातील चंद्रपूर दुस-या आणि अकोला सातव्या स्थानावर असताना राजस्थानातील चुरु ४३ अंश सेल्सिअस तापमानाच्या नोंदीमुळे नवव्या तर बार्मेर ४२.८ अंश सेल्सिअसच्या नोंदीमुळे तापमानात बाराव्या स्थानावर आहे.
Join Our WhatsApp Community