पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ३८० पंप; वर्षाला सुमारे ४६ कोटींचा खर्च

125

मुंबईतील नालेसफाईच्या कामांना अद्याप सुरुवात झाली नसली तरी मुंबईतील अनेक पूर प्रवण क्षेत्रामध्ये तुंबणाऱ्या पाण्याची भीती लक्षात घेता अनेक ठिकाणी महापालिकेने कामे हाती घेतली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पर्जन्य जलवाहिन्यांसह मिनी पंपिंग स्टेशनची कामे केली जात आहे. त्यामुळे तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरात येणाऱ्या पंपांची संख्या कमी होणे अपेक्षित असताना मागील वर्षीच्या दुप्पट ते तिप्पट पंप लावले जाणार आहे. त्यामुळे या पंपांकरता पुढील दोन वर्षांकरता ९२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

पाण्याचा निचरा करणारे पंप

मुंबईत पावसामुळे सखल भागात पाणी जमा होते व त्याचा निचरा होत नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून राहत पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. परिणामी लोकांच्या घरांमध्ये तसेच दुकानदारांमध्ये पाणी शिरले जाते तसेच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. तयामुळे सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मागील १४ वर्षांपासून पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांची व्यवस्था केली जाते. या पंपाद्वारे पावसामुळे तुंबलेले पाणी जवळच्या नाल्यात किंवा मलनि:सारण वाहिनीत सोडले जाते. मंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये तसेच केईएम रुग्णालय आणि लोकमान्य टिळक अशा दोन मोठ्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पाण्याचा निचरा करणारे पंप बसवले जातात.

( हेही वाचा : एसटी कामागारांकडे उरले फक्त २ दिवस… )

मुंबईत दरवर्षी स्थायी समितीच्या मंजुरीने २९२ पंप बसवले जातात. परंतु सन २०२० मध्ये २९२ अतिरिक्त ८६ पंप याप्रमाणे ३८८ पंप बसवण्यात आले होत, सन २०२१मध्ये २९२ अधिक १३४ अशाप्रकारे ४२६ पंप बसवले होते. तर पुढील दोन वर्षांमध्ये ३८० पंप बसवले जाणार आहे. या ३८० पंपांकरता वर्षभरासाठी ४६ कोटी रुपये आणि दोन वर्षांकरता सुमारे ९२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबईत पाण्याचा निचरा करण्याबाबतची कामे हाती घेण्यात आल्याने यंदा पंपांची संख्या कमी होणे अपेक्षित होते. परंतु सर्व प्रकारची कामे केली जात असताना पंपांची संख्या कमी होणे अपेक्षित असतानाच प्रशासनाने मात्र ३८० पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोळा गटांमध्ये निविदा काढून कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये दोन वर्षांकरता ९२ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.