देशभरात उष्णतेच्या तीव्र झळा प्रभावी ठरत असताना जागतिक नोंदीत चंद्रपूरातील मंगळवारचे कमाल तापमान तिस-या स्थानावर पोहोचले. चंद्रपूरात कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले होते. देशातही चंद्रपूराचे कमाल तापमान पहिल्या स्थानावर होते. मात्र रायगडातील भिरा येथील हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्रात कमाल तापमान ४३.५ अंश सेल्सिअवर पोहोचले.
( हेही वाचा : पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ३८० पंप; वर्षाला सुमारे ४६ कोटींचा खर्च )
चंद्रपूरात केंद्रीय हवामान खात्यातील यंत्रणांतूनच कमाल तापमानाची मोजणी झाली होती. मात्र राज्यातील सर्वच भागांतील कमाल तापमानाची नोंद यंत्रणेमार्फत न होता काही ठिकाणी हवामान खाते स्वयंचलिय केंद्रातून (ऑटोमेटिक व्हेदर स्टेशन) कमाल तापमानाची नोंद घेते. भिरा येथील कमाल तापमान तीन वर्षांपूर्वी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने बंद केले. भिरा येथील कमाल तापमान इतर नजीकच्या केंद्रांच्या तुलनेत चार ते पाच अंशाने जास्त नोंदवले जात होते. कमाल तापमान सतत ४५ अंश सेल्सिअसने नोंदवले जात असल्याने येथील केंद्राला हवामान अधिका-यांनी भेट देत कमाल तापमानाची दर दिवसाची मोजणी बंद केली होती. हे केंद्र इतर नजीकच्या हवामान केंद्रांच्या तुलनेत किनारपट्टीपासून लांब आहे. अजूनही भिरा येथील केंद्रात मॅन्यूअल होत असलेल्या तापमानाच्या नोंदीची माहिती हवामान खाते देत नाही.
भिरा येथील स्वयंचलित केंद्रातील कमाल तापमानाची मोजणी नुकतीच हवामान खात्याने सुरु केली. हे स्वंयचलित केंद्र काही वर्ष कर्जतप्रमाणेच बंद होते. मात्र आता भिरा येथील मंगळवारी नोंदवलेले कमाल तापमान ४३.५ अंशावर पोहोचल्याने पुन्हा भिरा येथील तापमान नोंदणीसाठी निवडलेली जागा वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय हवामान खात्याच्या पुणे शाखेतील प्रमुख आणि ‘जी’ प्रवर्गातील शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
कुठे आहे भिरा येथील हवामान खात्याचे स्वंयचलित केंद्र
भिरा येथील स्वयंचलित केंद्र (ऑटोमेटिक व्हेदर सेंटर) हे समुद्रसपाटीपासून ५० किलोमीटर दूर आहे. ताम्हिणी घाटाच्या पायश्याशी हे सेंटर उभारण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community