भाजपचे आयुक्तांना पत्र: पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कामकाजाची अपेक्षा

153

मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आल्यानंतर या पुढील स्थायी समितीने राखून ठेवलेले १२३ प्रस्ताव आणि इतर विकास कामांचे प्रस्ताव प्रशासक यांच्या माध्यमातून मंजूर केले जाणार आहेत. यासाठी समित्या नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू असतानाच भाजपने त्यांना पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कामकाज करण्याचे स्मरण करून दिले आहे. त्यामुळे विविध समिती समोरील आर्थिक प्रस्ताव मुंबई व उपनगरातील लोकांच्या माहितीकरिता महानगरपालिकेच्या संकेतस्थळांवर व महापालिकेच्या मुख्यालयाच्या सूचना फलकावर किंवा अन्य व्यवस्थेने लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात यावे व पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

समित्या गठीत करून या प्रस्तावांना मिळणार मंजुरी

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आल्या नंतर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चहल यांनी काही समित्या गठीत करून त्या माध्यमातून या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा विचार केला आहे. त्यानुसार शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, मागील दिवसात वर्तमान पत्रात वाचल्याप्रमाणे आपण यापुढे मनपाचे प्रशासक म्हणून पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता महापालिकेच्या वेगवेगळ्या आर्थिक विषयाचे प्रस्तावासाठी अधिकाऱ्यांच्या समित्या निर्माण करणार आहात. या पूर्वीच्या अनुभवाप्रमाणे कुंपणच शेतखाते असे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभारामध्ये सिद्ध झाले आहेत.

(हेही वाचा – आता पेट्रोलनंतर डिझेलनेही ओलांडला शंभर रुपयांचा टप्पा)

समित्यांच्या कारभार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त होणार!

आपण निर्माण केलेल्या समितीपुढे महापालिकेचे विविध खात्यांचे आर्थिक प्रस्ताव जेव्हा जेव्हा छाननीसाठी व आपल्या मंजुरीकरिता पाठविण्यात येतील, असे समितीपुढील प्रस्ताव आपणास पाठविल्याबरोबरच व मंजुरीसाठी प्रस्तावित असताना असे विविध समिती समोरील आर्थिक प्रस्ताव मुंबई व उपनगरातील लोकांच्या माहितीकरिता आपण महानगरपालिकेच्या संकेतस्थळांवर व महापालिकेच्या मुख्यालयाच्या सूचना फलकावर किंवा अन्य व्यवस्थेने लोकांना पाहण्यासाठी ठेवावे अशाप्रकारची सूचना केली आहे. पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता आपण ही सूचना करत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. समित्यांच्या कारभार हा पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यात यावा, जेणेकरुन अनाधावनाने सुद्धा आपल्याकडून याची पायमल्ली होणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.