रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान!

171

रिफायनरी प्रकल्पावरुन आता नवीन बातमी समोर येत आहे. नाणार  येथे उभारल्या जाणा-या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केल्याने, आता हा प्रकल्प राजापूरमधील बारसू गावात हलवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या पर्यायी जागेचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात उल्लेख केल्यानंतर आता बारसू गावच्या ग्रामस्थांनीही रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. बारसू गावातील ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत, आंदोलन केले. त्यामुळे या प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान झाल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाणार रिफायनरीसाठी लागणारी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2 हजार 414 एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा या पत्रामध्ये उल्लेखही करण्यात आला आहे.

( हेही वाचा: J&K: बुरखा घातलेल्या दहशतवाद्यांनी CRPF कॅम्पवर फेकला बॉम्ब , व्हिडिओ व्हायरल ! )

विश्वास संपादन करुनच पुढे जाणार

कोकण दौ-यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्याने होणाऱ्या मागणीमुळे आपण तिथून तो हलवला आहे. लोकवस्ती असल्याने नाणारमधून बाहेर हलवण्यात आले आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल, तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढे जायचे आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही . असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.