एप्रिल-मे महिना आला की, सर्वांनाच आंब्याची आतुरता असते. फळांचा राजा आंबा हे सर्वांचेच आवडते फळ असते. त्यामुळे आंब्यांच्या पेट्यांना बाजारात मोठी मागणी असते. कितीही महाग असला तरी लोक आवर्जून आंबा खातात. आजवर आंबा म्हटलं की आपल्याला कोकणातला हापूस आंबा आठवतो परंतु अलिकडे मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये उत्पादित केला जाणारा ‘ताईगो नो तामागो’ या आंब्याला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परदेशात या एका आंब्याची किंमत जवळपास २ लाख ७० हजार रुपये आहे. मुख्यत: हा आंबा जपानमध्ये पिकतो. मात्र आता या आंब्याची मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शेती होऊ लागली आहे.
( हेही वाचा : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट )
आंब्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था
संकल्प परिहार यांनी उजाड जमिनीवर जबलपूरमध्ये आंब्याचे उत्पादन घेतले आहे. ‘ताईगो नो तामागो’ आंब्याचे वजन जवळपास ९०० ग्रॅम आहे. पिकल्यावर या आंब्याचा रंग फिकट पिवला आणि लाल होतो. या आंब्याची काळजी घेण्यासाठी जबलपूरमध्ये विशेष सुरक्षा घेतली जाते. आंब्याची चोरी होऊ नये म्हणून बागेत ३ सुरक्षा रक्षक आणि ९ श्वान तैनात ठेवले आहेत. या आंब्याला एग ऑफ सन म्हणजेच सूर्याचे अंड असे देखील म्हटले जाते. ‘ताईगो नो तामागो’ची त्यांनी तब्बल ५२ झाडे लावली आहेत.
काही दिवसांपूर्वी संकल्प परिहारांच्या बागेत आंब्याची चोरी झाली होती त्यामुळे आंब्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी विशेष काळजी घेतली आहे.
Join Our WhatsApp Community