गरीब, गरजू आमदारांना हक्काचे घर दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

128

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मुंबईत हक्काची घर बांधून देण्याची घोषणा केली. यावर सोशल मीडियावर अनेकांनी खोचक टीकाही केल्या. मात्र भंडाऱ्यातील जेवनाळा येथील युवा शेतकऱ्यांनी या बद्दलचे आभार मानणारे बॅनर लावत थेट मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याने गाव चर्चेत येत आहे.

शेतकऱ्यांनी बॅनरबाजी करत व्यक्त केला रोष

मागील आठवड्यात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत हक्काची ३०० घरे बांधून देण्याची घोषणा केली. या वर संतप्त शेतकऱ्यासह नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला तर लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील तरुण शेतकऱ्यांनी गरीब व गरजू आमदारांना हक्काचे घर मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे आभार, असे चक्क बॅनर लावून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. शासनाकडून एखादी घोषणा झाली की सत्ताधाऱ्यांकडून मोठे-मोठे फलक लावत स्वतःची वाहवाही केली जाते मात्र आता आमदारांना घरे दिल्यावर याची पाहिजे तेवढी प्रसिद्धी केली जात नसल्याने जनसामान्यांना सरकारने घेतलेले निर्णय माहिती व्हावी या उद्देशाने बॅनर लावत असल्याचे तरुणांनी सांगितले.

(हेही वाचा – ‘या’ प्रकरणी मुंबई मेट्रोला उच्च न्यायालयाचा दिलासा)

… तर सरकारला शेतकऱ्यांपेक्षा आमदारांची चिंता

ग्रामीण भागातील अनेक नागरिक हे घरकुलाच्या प्रतीक्षेत असताना शासन आपल्या आमदारांना घरे बांधून देत आहे. मग या गरीब आमदारांना निवाऱ्याची व्यवस्था तर झाली आता अंतोदय रेशन कार्ड देऊन अन्नाची व्यवस्था करून दिल्यास यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वाचे ठरेल. तर राज्य सरकारला शेतकऱ्यांपेक्षा आपल्या आमदारांची जास्त चिंता असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर संसार थाटत असून राज्य सरकार आमदारांना घरे देत आहे. हीच बाब सर्वसान्यानांना माहिती व्हावी या उद्देशाने फलक लावून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.