केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी हायड्रोजन आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक (FCEV) वाहनातून संसद भवनात प्रवेश केला. ‘ग्रीन हायड्रोजन’ने युक्त कारचे प्रात्यक्षिक बघून त्याचे परीक्षण केले. टोयोटा मिराई असे या कारचे नाव आहे. टोयोटाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही कार तयार केली असून त्यात अत्याधुनिक इंधन सेल यंत्रणा बसवली आहे. ही सिस्टम सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे मिश्रण करून एका विशेष प्रक्रियेद्वारे वीज निर्माण करते. या विजेच्या साहाय्याने गाडी धावते.
Delhi | Union Road Transport & Highways minister Nitin Gadkari rides in a green hydrogen-powered car to Parliament pic.twitter.com/ymwtzaGRCm
— ANI (@ANI) March 30, 2022
हायड्रोफ्यूल कार भारताचं भविष्य
ग्रीन हायड्रोजन भारतात तयार केले जाईल, देशात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशन्सची स्थापना केली जाईल, असे आश्वासन नितीन गडकरींनी माध्यमांशी बोलताना दिले. या कारबाबत बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही कार पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. तसेच या कारमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ते पुढे म्हणाले की ही कार भारताचं भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु हायड्रोफ्यूल कारमुळे प्रदूषण होत नाही.
(हेही वाचा – गरीब, गरजू आमदारांना हक्काचे घर दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!)
भारत लवकरच करणार हरित हायड्रोजन निर्यात
भारत लवकरच हरित हायड्रोजन निर्यात करणारा देश होणार आहे. भारतातील स्वच्छ आणि अत्याधुनिक गतिशीलतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून केंद्र सरकार ‘नॅशनल हायड्रोजन मिशन’द्वारे हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही गडकरी म्हणाले
Join Our WhatsApp Community