विदर्भात सुरु असलेली उष्णतेची तीव्र लाट सलग दुसऱ्या दिवशीही कायम होती. दुसऱ्या दिवशीही देशभरातील सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे नोंदवले गेले आहे. बुधवारी चंद्रपूर येथील कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बुधवारी चंद्रपूर जिल्हा जगभरातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत चौथ्या तर, मंगळवारी तिसऱ्या स्थानावर होता.
( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )
तापमानात वाढ
अकोल्याचे बुधवारी नोंदवलेले तापमान ४३.२ अंश सेल्सिअस ते. जगाच्या उष्ण शहरांच्या यादीत अकोला अकराव्या स्थानी आहे. चंद्रपूर आणि अकोल्यात हवामान केंद्रातून मोजणी होते. मात्र भिरा या रायगड जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रात ४३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. मात्र केवळ स्वयंचलित केंद्रात नोंदणी झालेले भिऱ्याचे तापमान जगाच्या अधिकृत उष्ण दहा शहरांच्या यादीत नोंदले गेले नाही. ही तापमान मोजणी ग्राह्य धरल्यास भिरा हे जगात दहाव्या क्रमांकावर येते. मूळ यादीत सेनेगल देशातील तांबागोडा शहर दहाव्या स्थानी आहे. या आंतरराष्ट्रीय अधिकृत मूळ नोंदणीनुसार भारतातील पिल्लाणी शहरात नोंदवलेले ४३.१ अंश सेल्सिअस आणि चुरू येथील ४३ अंश सेल्सिअस या कमाल तापमानाची नोंद अनुक्रमे १२ आणि १३व्या क्रमांकावर आहे.
Join Our WhatsApp Community