कोकणात आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठीच्या साधनसामग्रीचे लोकार्पण

109

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत पोर्टेबल इन्फ्लाटेबल एलईडी लाइटिंग सिस्टीम आणि पूर परिस्थितीत बचावकार्यासाठी आवश्यक असलेल्या रबरबोट आणि इतर साधनसामग्रीचे लोकार्पण चिपळूण येथे झाले.

आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचावकार्य करण्यासाठी सुविधा

यावेळी आदित्य ठाकरेंनी चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ काढणाऱ्या उपक्रमाची पाहणी केली. रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या, मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात पडणारा पाऊस यामुळे रत्नागिरी दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचावकार्य करण्यासाठी रबरबोट आणि इतर साधनसामग्रीचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आपत्तीकाळात रात्रीच्या वेळी अडगळीच्या ठिकाणी जनरेटर अथवा मोठ्या बॅटऱ्या उपलब्ध न झाल्याने अडचणी निर्माण होतात. अशा वेळी पोर्टेबल इन्फ्लाटेबल एलईडी लाइटिंग सिस्टीमचा वापर करून घाट, रस्ते, समुद्रकिनारे अशा ठिकाणी शोध आणि बचाव कार्य करण्यास सुलभ होणार आहे असे प्रशासनाने सांगितले.

( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )

आदित्य ठाकरे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींसमवेत पेठमाप, चिपळूण येथील वाशिष्ठी नदीच्या काठावर वृक्षरोपण केले. यावेळी कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.