रशिया युक्रेन युद्ध सध्या सुरु आहे. या युद्दामुळे जगभरात विविध प्रकारचे परिणाम दिसून येत आहेत. इंधन दरवाढ कमालीची झाली आहे. मात्र भारतात या युद्धाचा एका वेगळ्याच गोष्टीला फटका बसलेला पाहायला मिळत आहे. तुम्हाला कोणी सांगितले की रशिया-युक्रेन युद्धामुळे जर तुम्हाला लस घेण्यासाठी दिल्लीला जावे लागेल तर, होय हे खरे आहे. या युद्धामुळे भारतामध्ये येल्लो फीवर या आजारावरच्या लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा इतका प्रचंड आहे की, ही लसच महाराष्ट्रात उपलब्ध नाही. त्यामुळे ही लस घेण्यासाठी आता दिल्ली वारी करावी लागणार आहे.
म्हणून देशात लशीचा तुटवडा
येल्लो फीवर ही लस परदेश प्रवास करणा-यांना घेणे गरजेची असते. आपल्या राज्यात सध्या कुठेच ही लस उपलब्ध नाही. त्यामुळे परदेशी जाण्यासाठी लस घ्यायची असल्यास, राज्यातील व्यक्तींना सध्या दिल्लीला जाऊन लस घ्यावी लागणार आहे. ही लस प्रामुख्याने ब्राझील, फ्रान्स, चीन , अमेरिका आणि रशिया या देशांत तयार केली जाते आणि जगभरात वितरित केली जाते. भारत सहाजिकच रशियाकडून या लशीची आयात करतो. सध्या युद्धामुळे रशिया या लशीचा पुरवठा करु शकत नाही, त्यामुळे अर्थातच पुरवठ्यावर मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतात खासकरुन महाराष्ट्र मुंबईमध्ये ही लस उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांना ही लस घेण्यासाठी दिल्लीला जाणे अनिवार्य आहे.
( हेही वाचा: नारायण राणेंच्या खात्यासाठी मोदींनीं मंजूर केले तब्बल इतके कोटी रुपये ! )
ही लस घेणे का आहे अनिवार्य?
दक्षिण अमेरिका असो वा आफ्रिका या खंडांमध्ये येल्लो फीवर या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. म्हणून या खंडांत प्रवास करणा-यांना येल्लो लस घेणे जागतिक आरोग्य संघटनेने अनिवार्य केले आहे. हा अतिशय भयंकर रोग असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community