‘ही’ चूक तुम्ही करू नका… कारण थेट दाखल होईल आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा!

168

अलिकडे लोक सर्रास विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. परंतु अशाप्रकारे विना हेल्मेट दुचाकी चालवणे अत्यंत धोकादायक असल्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयाने नवा निर्णय घेतला आहे. नाशिक पोलिसांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हेल्मेट सक्तीची मोहीम कठोर पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला असून विनाहेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालक व मालकांवर थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला आहे.

( हेही वाचा : बापरे! आता लस घ्यायला जावं लागणार दिल्लीला )

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’

मात्र पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयावर पेट्रोल पंपचालकांनी संताप व्यक्त करत हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पेट्रोल पंपचालकांचा आहे का असा सवाल पोलीस आयुक्तांना केला आहे. तसेच दुचाकी चालकासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेट घालणे बंधनकारक आहबे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असेही पाण्डेय यांनी सांगितले. नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम राबवत पोलीस आयुक्तलयाने नाशिककरांना हेल्मेटची सवय लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर विना हेल्मेट दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

विना हेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालक व मालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले तसेच गुन्हा दाखल झाल्यावरही पेट्रोल पंपावरील चित्र बदलले नाही तर तुमचा पेट्रोल पंप धोकादायक आहे असे का ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याऱ्या धोरणाचा आम्ही निषेध नोंदवतो. गुढी पाडव्याला पेट्रोल पंपाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पालकमंत्री व पोलिस आयुक्त यांच्याकडून आम्हाला योग्य तो न्याय मिळेल अशी संघटनेला आशा आहे. – भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.