अ‍ॅमेझॉनवर होत आहे भारतीय ‘गणराज्याचा’ अपमान

145

आजकाल माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी कव्हर आवश्यक झालं आहे. इन्श्यूरन्सचं कव्हर, मोबाईलचं कव्हर. म्हणजे आपली प्रत्येक वस्तू सुरक्षित राहावी, यासाठी आपण सतत धडपडत असतो.

आता पासपोर्ट शिवाय आपल्याला परदेशवारी करणं हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक जण पासपोर्टला देखील कव्हर लावत असतात. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर अशी मस्त कव्हर्स स्वस्त दरांत उपलब्ध असतात. परंतु अ‍ॅमेझॉनवर मिळणा-या पासपोर्ट कव्हरवर मात्र भारताचा अपमान करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

(हेही वाचाः 1 एप्रिलपासून महाराष्ट्र मास्कमुक्त? मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरणार?)

काय आहे प्रकरण?

Amazon

भारतीय पासपोर्टवर देवनागरी आणि इंग्रजी अशा दोन्ही लिपिंमध्ये भारत गणराज्य असे लिहिले जाते. त्याचपद्धतीने अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी असलेल्या कव्हरवर देखील या दोन्ही लिपिंचा वापर करुन भारताची राजमुद्रा छापण्यात आली आहे. पण देवनागरी लिपीतील मजकूरात मात्र मोठी चूक झाल्याचे दिसत आहे. क्यूरो क्राफ्ट(Cuero Craft) या कंपनीने तयार केलेले हे कव्हर असून, ते अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही मोठ्या चुकीची कुठलीही शाहनिशा न करता अ‍ॅमेझॉनवर ही कव्हर्स विक्रीसाठी सर्रास उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

कारवाई कधी होणार?

ही केवळ चूक नसून हा एकप्रकारे भारतीय संघराज्याचा अपमान आहे. अ‍ॅमेझॉन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक भारतीय ग्राहक या प्लॅटफॉर्मवरुन दररोज मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करत असतात. त्यामुळे जर का अ‍ॅमेझॉनवर अशा पद्धतीने भारताचा अपमान होणार असेल, तर त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

(हेही वाचाः टोलच्या दरांत मोठी वाढ! 1 एप्रिलपासून असे असणार नवीन दर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.