उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टाकले मागे…

139

महाविकास आघाडी सरकारची स्थापना करून राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनवले, हा सगळा चमत्कार एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून दाखवला. महाविकास आघाडीचे ते सर्वेसर्वा बनले, पण सरकारला दोन वर्षे पूर्ण होताच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पितृतुल्य नेत्याला मागे टाकले. भारतातील १०० शक्तीशाली नेत्यांमध्ये ठाकरे यांनी १६वा क्रमांक पटकावला आहे, तर शरद पवार यांनी १७वे स्थान मिळवले आहे.

पहिल्या क्रमांकावर नरेंद्र मोदीच    

एक इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील १०० शक्तिशाली व्यक्तींची यादी बनवली आहे, या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांनी अव्वलस्थान पटकावले आहे. तर या यादीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दुसऱ्या स्थानावर आहेत. नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी सहावे स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत सोळावे आणि शरद पवार यांनी १७ वे स्थान पटकावले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना ८३ वे स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तिसऱ्या स्थानावार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना चौथे स्थान मिळाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे पाचव्या स्थानावर आहेत. उद्योगपती गौतम अदानी हे सातव्या स्थानी आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवव्या आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन दहाव्या स्थानावर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या अकराव्या स्थानी आहेत. तर सरन्यायाधीश रमण्णा हे १२ व्या स्थानी आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तेरावे स्थान मिळाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २७ वे, राहुल गांधी यांना ५१ वे आणि अखिलेश यादव यांना ५६ वे स्थान मिळाले आहे.

(हेही वाचा अजानची आवश्यकता नाही, बंद करा! प्रसाद लाड यांची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.