महापालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार

126

मुंबई महानगरपालिकेच्या विविध तक्रार समित्यांमध्ये कामकाज करताना उल्लेखनीय योगदान देणाऱया डॉ. मेहरा भोईर, डॉ. भारती खरात, डॉ. रजनी जगताप, स्नेहा खांडेकर, डॉ. संजय स्वामी, विद्या रानडे, अनुराधा दळवी, नीलेश खोंड, सचिन महाडिक यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर माजी अध्यक्षा डॉ. पद्मजा केसकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रात हा सोहळा संपन्न झाला.

( हेही वाचा : महाराष्ट्र झाला निर्बंधमुक्त; आता मास्क वापरणे ऐच्छिक, गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी )

मानपत्र प्रदान करुन सत्कार

मुंबई महानगरास स्त्री सखी शहर बनविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध अंतर्गत तक्रार समित्यांमध्ये उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या सदस्यांचा यावेळी मानपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आला.

Award 2

महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक

याप्रसंगी बोलतांना अतिरिक्‍त आयुक्त आश्विनी भिडे यांनी प्रशासकीय क्षेत्रात महिला म्हणून कामकाज करीत असताना त्यांना आलेले अनुभव कथन केले. स्त्रिया समर्थपणे सर्वच क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत असून कामाच्या ठिकाणी येणार्‍या अडचणींनाही धीराने तोंड देत असतात. याकरिता महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या सोनाली पाटणकर यांनी सायबर गुन्हे कसे व का घडतात आणि त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या अध्यक्षा तथा कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी अंतर्गत तक्रार समिती सदस्यांचे स्वागत केले. संस्थेच्या सचिव अपूर्वा प्रभू यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. समन्वयक स्नेहा खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर, माजी सचिव डॉ. कामाक्षी भाटे यांनी आभारप्रदर्शन केले. अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष व सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते.

Award

Award 3

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.