भंडारा येथील बघेरा गावातील बावनघडी प्रकल्पातील छोट्या कालव्यामध्ये गुरुवारी सायंकाळी वाघाचा मृतदेह आढळला. विदर्भात सलग दुस-या दिवशी वाघाचा मृतदेह आढळला आहे. बुधवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृतदेह आढळून आला होता.
( हेही वाचा : टोलच्या दरांत मोठी वाढ! 1 एप्रिलपासून असे असणार नवीन दर )
वनाधिकाऱ्यांनी दिली माहिती
गुरुवारी सायंकाळी उशिरा वाघाचा मृतदेह कालव्याबाहेर काढण्यात आला. अंदाजे दीड वर्षांचा हा नर वाघ असल्याची माहिती स्थानिक वनाधिका-यांनी दिली. वाघाचा पाया आणि शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या. मात्र हा भाग जंगलापासून फारच दूर असल्याने वाघ मोठे अंतर पार करुन नवी जागा शोधण्यासाठी आला असावा त्यात दुस-या जनावराशी झालेल्या हल्ल्यात वाघाचा मृत्यू होऊन वाघ कालव्यात पडला असावा, अशी शंका सूत्रांनी व्यक्त केली. वाघाच्या मृतदेहाचे शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन केले जाईल, अशी माहिती स्थानिक वनाधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community