दादर चैत्यभूमी पाठोपाठ बनवण्यात येत असलेल्या गिरगाव चौपाटीवरील प्रेक्षक गॅलरी अर्थात व्हिविंग गॅलरीच्या बांधकामावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. गॅलरीचे पक्के बांधकाम कुठलेही सीआरझेड नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून खांब (पिलर्स) बांधून केले गेले आहे. एमआरटीपी व सीआरझेड ऍक्टप्रमाणे कारवाई करावी अन्यथा एम. आर. टी. पी. ऍक्ट कलम ५६(ए) अंतर्गत संबधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.
जनतेच्या पैशांचा गैरवापर होऊ नये
मुंबईला पर्यटनाच्यादृष्टीने सुशोभित करून पर्यटनकांना आकर्षित केलेच पाहिजे , ही आमचीपण भूमिका आहे पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशांचा गैरवापर होता कामा नये आणि हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी एम. आर. टी. पी. कायद्याने आपल्यावर टाकली असल्याची भूमिका मांडत नितेश राणे यांनी आयुक्तांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
इथे उभारली जातेय दर्शक गॅलरी
दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्यावतीने नवीन प्रेक्षक गॅलरी (व्हिविंग गॅलरी) उभारण्याचे काम सुरू आहे. या गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्या वर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे.
( हेही वाचा: जगात उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर, अकोल्याची हॅट्रीक)
हे पक्के बांधकाम कुठलेही सीआरझेड नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून पिलर्स बांधून केले गेले आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झाले आहे आणि भविष्यात त्यामुळेच ग्रीन ट्रॅब्युनलकडून (एनजीटी) दंड सुद्धा आकारला जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे. एमआरटीपी व सीआरझेड ऍक्टप्रमाणे कारवाई करावी अन्यथा एम आर टी पी ऍक्ट कलम ५६(ए) अंतर्गत संबधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल, असा विनंती वजा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना दिला आहे.
Join Our WhatsApp Community