आता गृहमंत्री वळसे- पाटलांच्या ‘या’ भुमिकेवरुन आघाडीत बिघाडी!

126

महाविकास आघाडीतील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पडसाद गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. या प्रकरणात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील मंत्र्यांनी गृहमंत्र्यांविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, असा सवाल करून मंत्र्यांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.

कंबोज यांनी केली होती तक्रार

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी तलवारी उंचावून दाखविल्या. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन केल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात शेख, गायकवाड आणि प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विरोधात कंबोज यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली.

(हेही वाचा: गिरगाव चौपाटीवरील प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम नियमांना डावलून: भाजपने दिला आयुक्तांना इशारा )

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल 

दोन मंत्र्यांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी कोणत्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे, याची माहिती घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना देणयात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.