हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्या दिवशी मनसेचाही परंपरागत मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (शिवतीर्थ) होणार कोरोना संकटानंतर मनसेचा दोन वर्षांनी पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळावा होणार आहे. त्यामुळेच मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलणार आणि कुणाचा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान या मेळाव्याच्या निमित्ताने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे अशा आशयाचा तब्बल २० फूटाचा बॅनर मनसेकडून सेनाभवनासमोर लावण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात बॅनरबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
( हेही वाचा : मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे अवतरणार शिवसेनाप्रमुखांच्या रुपात )
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे अशा आशयाच्या बॅनरमुळे मनसेने शिवसेनेला थेट आवाहन केले आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने-सामने आहेत. असे असले तरी मनसेला आपली जागा निर्माण करावी लागणार आहे. सत्तेमुळे कठोर भूमिका घेताना शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात जाहीर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेची भूमिका
आजच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे. मनसे अधिकृत या त्यांच्या सोशल मिडिया पेजवरून राज ठाकरे यांच्या पुण्यातील भाषणाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आज हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर 2 एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाडव्याला, असा आवाज त्याला देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp CommunityRaj Thackeray यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणासाठी मनसेचा टिझर….@RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/fGuiZ2eXor
— Abhishek Karande (@Abhishekkaran16) March 31, 2022