संत तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहूमध्ये मांस आणि मासे विक्रीला ( Non Veg) बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे देहू महाराष्ट्रातील हे शुद्ध शाकाहारी (Pure Veg) शहर बनले आहे. हा निर्णय नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
( हेही वाचा : आता मेकअपही महागणार, सुंदर मी कशी दिसणार… )
मासे व मांस विक्रीवर बंदी
याआधी ग्रामपंचायतीने सुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र, ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि त्यानंतर कोरोनाची साथ सुरु झाली. त्यामुळे गेली दोन वर्षे हा निर्णय बारगळलेल्या अवस्थेतच राहिला होता. प्रशासक असताना मांसविक्री पुन्हा एकदा सुरु झाली होती. त्यानंतर आता नगरपरिषद स्थापित झाल्यानंतर हा बंदीचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. या बैठकीत वारकऱ्यांच्या व स्थानिक रहिवाशांच्या मागणीचा विचार करून देहू शहरात मासे व मांस विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासोबतच मंदिर परिसरात असलेल्या इंद्रायणी नदीत मासेमारी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community