सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात, येत्या रविवारी सुद्धा मुंबईत मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. रविवार २ एप्रिलला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : गुढीपाडव्यामुळे एसटी कामगारांवरील कारवाई टळली )
१२ तासांचा मेगाब्लॉक
- ठाणे-कल्याण जलद मार्गावर सकाळी 09.00 ते रात्री 09.00 पर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 07.55 ते संध्याकाळी 07.50 या वेळेत सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
- सकाळी 08.30 ते रात्री 09.12 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या जलद लोकल कल्याण आणि ठाणे/मुलुंड स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन रेल्वेसेवा उपलब्ध असतील.
- दिनांक 2 एप्रिल 2022 रात्री 9.00 पासून (शनिवार रात्री) ते दिनांक 3 एप्रिल 2022 सकाळी 7.00 वाजेपर्यंत (रविवार सकाळी) अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल, ज्यामुळे हार्बर मार्गावरील अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यानची उपनगरीय सेवा बंद राहतील.
प्रशासनाने व्यक्त केली दिलगिरी
हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community