भाजपाचे राज्यसभेत शतक! काँग्रेसची किती राहिली ताकद?

147

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वेळा केंद्रात बहुमताने सत्ता मिळवली. मात्र राज्यसभेतील अल्पमतामुळे भाजपाला मागील ७ वर्षे संपूर्ण सत्ता उपभोगता येत नाही, हे त्यांचे दुखणे आहे. मात्र आता भाजपची राज्यसभेतील संख्याबळ वाढत आहे. त्यामुळे भाजपसाठी ही बाब चांगले संकेत देत आहेत.

१९९० नंतरचा पहिला पक्ष 

भाजपने राज्यसभेत १०० चे संख्याबळ गाठले आहे. ते दुसरीकडे काँग्रेसचे मात्र राज्यसभेमधील संख्याबळ कमी झाले आहे. १९९० नंतर राज्यसभेत संख्याबळाचा शतक ठोकणारा भाजप पहिला पक्ष ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये प्रत्येकी एक जागा जिंकून भाजपाने राज्यसभेत १०० सदस्यांचा पराक्रम आपल्या नावे केला आहे. सहा राज्यांमधील १३ राज्यसभेच्या जागांसाठी नुकत्याच झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपाला एक जागा गमवावी लागली. तथापि भाजपाने तीन ईशान्येकडील राज्ये आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागा जिंकली, जिथे सर्व पाच सदस्य विरोधी पक्षांचे होते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने पाचही जागा जिंकल्या आहेत.

(हेही वाचा रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर १२ तासांचा मेगाब्लॉक!)

काँग्रेसची संख्या घटली 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राज्यसभेतील पक्षाची ताकद सातत्याने वाढत आहे. २०१४ मध्ये राज्यसभेत भाजपाची संख्या ५५ होती आणि तेव्हापासून अनेक राज्यांमध्ये पक्षाने सत्ता मिळवल्यामुळे ही संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ घटले त्यांचे २९ सदस्य आहेत. तर तृणमूलचे-१३, डीएमके- १०, बीजेडी-९, आम आदमी पार्टी-८, टीआरएस-६, वायएसआरसीपी-६, एआयएडीएमके-५, राजद-५ आणि एसपी-५ सदस्य आहेत. या अगोदर १९९० मध्ये असं झालं होतं, जेव्हा वरीष्ठ सभागृहात एखाद्या पक्षाच्या सदस्यांची संख्या १०० किंवा त्यापेक्षा जास्त होती. तेव्हा तत्कालीन सत्तारूढ पक्ष असलेल्या काँग्रेसचे १०८ सदस्य होते. १९९० च्या द्विवार्षिक निवडणुकीत राज्यसभेतील काँग्रेसच्या संख्येत घट होऊन ती ९९ झाली होती आणि तेव्हापासून ही संख्या कमी होताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.