अलिकडेच दुकानांच्या पाट्या देवनागरी भाषेत अर्थात मराठी भाषेतून करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यानंतर आता मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या नावाचे नामफलक मराठीत लावा अशा सूचना मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी दिल्या आहेत.
( हेही वाचा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणाऱ्या मुख्य पंचाचा मृत्यू! )
कुलसचिवांनी जाहीर केले परिपत्रक
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील नामफलक हे मराठीतून लावण्याची मागणी करण्यात येत होती. त्यावर शुक्रवारी कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले आहे असून त्यानुसार आता विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक हे मराठीतून लावण्यात येणार आहेत. नामफलकासह महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या माहिती पुस्तिका, अर्ज, प्रवेश प्रक्रिया अर्जही मराठीत द्यावे असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
( हेही वाचा : अखेर श्रीलंकेत आणीबाणी! )
विद्यापीठाने दिलेल्या सूचना
- महाविद्यालयाचे नाव दर्शनी भागात मराठी भाषेत असावे
- मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा.
- महाविद्यालयातील फलक व सूचना मराठीतून लिहाव्यात.
- माहिती पुस्तिका, अर्ज इतर सर्व माहिती मराठी भाषेतून उपलब्ध करावी.
- २७ फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करावा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन मराठीतून करावे.
Join Our WhatsApp Community