बिहारच्या अदितीला फेसबुकने केले करोडपती

137

फेसबुक, गुगल या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेश कंपन्यांना भारतातील बौद्धिकता कायम आकर्षित करत असते, त्यामुळे भारतातील आयटी क्षेत्रातील तरुणांना मोठं मोठ्या आकड्याचे पगार देऊन त्यांना घेतात. त्यासाठी या कंपन्यांना आता मुंबई, पुणे, बंगलोर सारख्या शहरांसोबत आता बिहारमधील पाटणा सारख्या शहरांमधूनही हुशार मुले मिळत आहेत.

पटना एनआयटीचा विक्रम मोडीत  

पटनाच्या एनआयटीच्या अदिती तिवारीला फेसबुककडून चक्क १ कोटी ६० लाखांचे पॅकेज दिल्याने सध्या ती चर्चेत आली आहे. अदिती इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. आता फेसबुकमध्ये ती फ्रंट एंड इंजिनिअर म्हणून काम करणार आहे. अदितीला एवढे मोठे पॅकेज मिळाल्याने पटना एनआयटीचा विक्रम मोडीत निघाला आहे. ही कामगिरी केल्यानंतर कॉलेजचा गेल्या पाच वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. एनआयटी पटनामधील विद्यार्थ्याला मिळालेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे.

(हेही वाचा भाजपाचे राज्यसभेत शतक! काँग्रेसची किती राहिली ताकद?)

५० ते ६० लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळालेले 

याआधी या कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक पॅकेजेस ५० ते ६० लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळालेले आहेत. अदितीने दिलेल्या माहितीनुसार तिला फेसबुककडून जानेवारी महिन्यातच ऑफर लेटर मिळाले होते. मात्र त्यांनी नुकतीच कॉलेजला याबाबत माहिती दिली आहे. अदिती ही जमशेदपूरची रहिवासी आहे. अदितीचे वडील संजय तिवारी हे टाटा स्टीलमध्ये काम करतात. आई मधु सरकारी शाळेत शिक्षिका आहे. पटना एनआयटीच्या ट्विटर पेजवरूनही अदितीचे या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.