सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव असतो. प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघाताचा प्रभाव आढळून येतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.
उष्माघात होण्याची कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
- कारखान्यात बॉयलर रूममध्ये काम करणे.
- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.
- घट्ट कपड्यांचा वापर करणे.
- प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे
- थकवा येणे
- ताप येणे
- त्वचा कोरडी पडणे
- भूक न लागणे
- चक्कर येणे
- निरुत्साही होणे
- डोके दुखणे
- रक्तदाब वाढणे
- मानसिक बैचेन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था
प्रतिबंधात्मक उपाय
- वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
- कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
- उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे कपडे) वापरू नयेत.
- सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
- जलसंजीवनीचा वापर करावा.
- पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.
- उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम करणे थांबवावे.
- उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा उपरणेचा वापर करावा.
उपचार पद्धती
- रुग्णास हवेशीर व वातानुकूलित खोलीत ठेवावे.
- रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
- रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, किंवा आइस पॅक लावावेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटी देऊन जनतेला उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, याबाबत पुरेशी माहिती द्यावी. 1 एप्रिल ते 26 मे 2022 हा उष्माघात कालावधी असून या कालावधीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community