नेपाळ हिंदू राष्ट्र होणार…राजकीय पातळीवर सुरु आहे प्रक्रिया!

147

नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे तेथील सरकारचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री प्रेम अली यांनी जाहीर कार्यक्रमात समर्थन केले. नेपाळमध्ये या मागणीसाठी मोठे जनमत आहे, असे मंत्री प्रेम अली म्हणाले.

जनमत संग्रह करणार  

येथे विश्व हिंदू महासंघाच्या कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन करताना त्यांनी अशी मागणी आल्यास विधायक भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. नेपाळ, भारत, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, यूएसए, जर्मनी आणि यूकेसह 12 देशांतील 150 हून अधिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होत आहेत. फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंग यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर ते म्हणाले की, सध्याच्या पाच पक्षांच्या संयुक्त सरकारकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत आहे. अशा परिस्थितीत नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या मागणीवर जनमत संग्रह होऊ शकतो.

(हेही वाचा ओबीसी-मराठा वाद पुन्हा पेटणार!)

बहुसंख्य लोकसंख्या हिंदू राष्ट्राच्या बाजूने असल्यास… 

नेपाळला राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष ठरवले आहे, पण जर बहुसंख्य लोकसंख्या हिंदू राष्ट्राच्या बाजूने असेल, तर तसे का होत नाही. 2006 मध्ये यशस्वी जनआंदोलनानंतर राजेशाही संपुष्टात आली आणि 2008 मध्ये नेपाळला धर्मनिरपेक्ष देश बनवण्यात आले. येथील बहुसंख्य लोकसंख्या हिंदू आहे. याआधी बैठकीदरम्यान अजय सिंह म्हणाले होते की, नेपाळला अचानक धर्मनिरपेक्ष देश घोषित केल्याने मला आश्चर्य वाटले. लोकसंख्येच्या आधारावर काही देशांना इस्लामिक तर काहींना ख्रिश्चन म्हणून घोषित केले जाऊ शकते, मग नेपाळ हा हिंदू लोकशाही देश काअसू शकत नाही, असा सवाल त्यांनी केला. नेपाळमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन विचारधारा वेगळी ठेवून हिंदू राष्ट्र घोषित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.