मनसेच्या मेळाव्यात ‘जय श्रीराम’च्या घोषणा

151
गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात फक्त एकाच विषयाची चर्चा सुरु आहे, मनसेचा शिवतीर्थावरील मेळावा कोणत्या रंगात दिसणार आहे. अर्थात राज ठाकरे त्याच्या लाखो महाराष्ट्र सैनिकांना आता हिंदुत्वाची कास धरण्याचे आदेश देणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे संध्याकाळी जमा होणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना याची कुणकुण लागली, त्यामुळे महाराष्ट्र सैनिक मोठ्या उत्साहात ‘जय श्रीराम’, अशा घोषणा देताना दिसत आहेत.

सेनेची जागा मनसे घेणार 

राज ठाकरे यांच्या भाषणाला काही तास उरले असताना शिवतीर्थावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो महाराष्ट्र सैनिक मैदानात जमा होऊ लागले आहेत. दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती आता मनसेने घेण्याची रणनीती आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच राज्यात सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने कदाचित मध्यावधी लागू शकतात, या सर्व शक्यतांमुळे राज ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्वाचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आता महाराष्ट्र सैनिक हे मैदानात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देताना दिसत आहे.
https://www.youtube.com/watch?v=rrhdl7wGaeU

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.