आईच्या आत्महत्येनंतर चिमुकलीचे भावूक पत्र, म्हणाली आई तू सर्वात बेस्ट!

125

राजस्थानात चर्चेत असणाऱ्या डॉ. अर्चना शर्मा आत्महत्या प्रकरणानंतर त्यांच्या मुलीचे भावूक पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चौथीत शिकणाऱ्या श्यामभवीने तिच्या आईच्या आठवणीत एक पत्र लिहिले आहे. हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. हे पत्र श्यामभवीने तिच्या वडिलांना वाचून दाखवले तेव्हा वडील डॉ. सुनीत धाय मोकलून रडू लागले. डॉ. अर्चना शर्मा यांची मुलगी मागील ३ दिवसांपासून जयपूरमध्ये आहे. त्याठिकाणाहून तिने हे पत्र आईच्या आठवणीत लिहिले.

काय म्हटले त्या पत्रात? 

श्यामभवीने तिच्या पत्रात म्हटले की, आई तू सर्वात बेस्ट आहेस. जर जगात सर्वात बेस्ट महिलांना निवडले गेले तर तुझ्यासारखे कुणी चांगले असू शकत नाही. कारण माझ्या आईला बेस्ट मम्मी अवॉर्ड मिळाला आहे. पण मी रडणार नाही. कारण सर्वांना वाटेल मला तुझी आठवण येत आहे. जर मी रडले तर सर्व रडायला सुरुवात करतील. परंतु मी माझ्या आईला क्यूट नावही ठेवले आहे. आतापर्यंत मी तिला प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारत होती असे तिने लिहिले आहे. श्यामभवी ही राजस्थानच्या दौसा येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉ. अर्चना शर्मा यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी अर्चना यांनी जीव दिला होता. एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दोष ठेवण्यात आला. जेलमध्ये जावे लागेल या भीतीने डॉ. अर्चनाने मानसिक तणावाखाली येत गळफास घेतला. आता त्यांची ८ वर्षाची मुलीने आईच्या आठवणीत लिहिलेले पत्र समोर आले आहे. हे पत्र तिने तिच्या मित्रांनाही पाठवले. जेव्हा श्यामभवीने लिहिलेले पत्र तिच्या वडिलांनी पाहिले तेव्हा ते ढसाढसा रडले. हे पत्र श्यामभवीच्या मावशीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

(हेही वाचा नेपाळ हिंदू राष्ट्र होणार…राजकीय पातळीवर सुरु आहे प्रक्रिया!)

काय आहे प्रकरण? 

दौसातील आनंद हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात म्हटले होते की, मी कुठलीही चूक केली नाही. कुणालाही मारले नाही. माझा मृत्यू कदाचित मी निर्दोष असल्याचे सिद्ध करेल. मी पती आणि मुलांवर खूप प्रेम करते. कृपया, माझ्या मृत्यूनंतर त्यांना कुणीही त्रास देऊ नका. पीपीएच कॉम्पलिकेशन होते. त्यासाठी डॉक्टरांना दोष देणे बंद करा. डॉक्टरांना त्रास देऊ नका. माझ्या मुलांना आईची कमतरता भासू देऊ नका, असे मृत्युपूर्वी डॉ. अर्चनाने म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.