निर्बंधसक्तीकडून निघालो आहोत पण… काय म्हणाले मुख्यमंत्री?

134

राज्य निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन केले. निर्बंध हटवले असले, तरी मास्क वारण्याचं आवाहन यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली विनंती

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच इतकी माणसं मी एकत्र बघत आहे. कोरोनानंतर निर्बंधमुक्त असा हा पहिलाच दिवस आहे. आज जीएसटी भवन, मराठी भाषा भवनाचा भूमिपूजन सोहळा आणि आता मेट्रोचं उद्घाटन होत आहे. पण या सर्व कार्यक्रमांमध्ये तोंडावर मास्क आवर्जून कोणी घातले असतील तर फक्त आणि फक्त मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातला आहे. आपण निर्बंधसक्तीकडून निघालो आहोत पण निर्बंधमुक्त झालेलो नाहीत. त्यामुळे जोपर्यंत मी आणि उपमुख्यमंत्री मास्क घालत आहेत तोपर्यंत तुम्हीही मास्क घाला, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केली आहे.

(हेही वाचाः बापरे! मुख्यमंत्र्यांनी सांगितला साथीचा नवा रोग… म्हणाले, याचं निदान होत नाही)

काळजी घेण्याची गरज

आपण आजही खबरदारी घेणं गरजेचं आहे. जेणेकरुन पुढचं संकट येणार नाही आणि आलं तरी ते किरकोळ स्वरुपाचं असेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसेच यावेळी देखील त्यांनी सरकारमध्ये कुठलीही धुसफुस नसल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.