मोफत घरांमुळेच झोपडपट्ट्या वाढल्या, लोंढे वाढले! राज ठाकरेंची टीका

150

मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये झोपडपट्ट्या वाढू लागले असून यामुळे शहरे आता बकाल होऊ लागली आहे. १९९५ला राज्यात आलेल्या युती सरकारच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीवासियांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेतला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याबाबतची योजना राबवण्यात आली. मात्र, या योजनेमुळेच मुंबइत लोंढे वाढल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. या योजनेचा हेतू आणि उद्देश चांगला असला तरी मोफत घर मिळत असल्यामुळेच मुंबईमध्ये १९९५नंतर लोंढे वाढू लागले,असे त्यांनी शिवतिर्थावरील गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये सांगितले.

(हेही वाचा मुख्यमंत्री व्हायचे होते मग आता भोगा! राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)

मुंबईत फुकट घरे मराठी भाषिकांनाच

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९९५ला जेव्हा राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आल  होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांनी झोपडपट्टीवासियांना मोफत घरे देण्याची घोषणा केला. ही योजना त्यावेळी मला आवडली नव्हती. बाळासाहेबांकडे याबाबत मी नाराजीही व्यक्त करत विरोध दर्शवला. परंतु बाळासाहेबांनी मला त्यावेळी गप्प राहण्यास सांगितले. बाळासाहेबांचा झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गरीबांना मोफत घरे देण्याचा हेतू  तसेच उद्देश चांगला होता. पण मुंबईत ही फुकट घरे मिळत असल्यानेच याठिकाणी परराज्यांमधून येणारे लोंढे वाढू लागले. मुंबईसह ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये यानंतर वाढत्या लोंढ्यांमुळे झोपड्या वाढू लागल्या आहे. गरीबांना घरे मिळायला हवी.  पण जे पूर्वापार राहतात त्यांना ही घरे मिळायला हवी अशी भूमिका स्पष्ट केली.

(हेही वाचा दाऊदशी संबंध म्हणून मलिक जेलमध्ये जातात आणि अंगठा दाखवतात! राज ठाकरेंनी डिवचले)

गरीबांप्रमाणे पोलिसांनाही घरे मिळायला हवीत, पण आमदारांना कशाला घरे द्यायला हवी. आमच्या पक्षाचे आमदार राजू पाटील यांनी प्रथम याला विरोध केला की आमदारांना घरे देवू नका म्हणून. जर यांना घरे देणार असतील तर देवाणघेवाणाची योजना आखायला हवी. त्यांना घरे द्यायची आणि त्यांचे फॉर्म हाऊस आपण घ्यायला हवी. आमदारांना मिळत असलेल्या पेन्शनबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांची पेन्शन बंद करायला हवी,असे सांगितले. आमदार म्हणून समाजकार्य करता म्हणजे उपकार करता का असा सवाल करत आमदार आणि खासदारांची पेन्शन बंद व्हायला हवी,असे सांगितले.

मातोश्रीच्या जवळ बेहरामपाडा वाढला

वांद्र्याला आपण जेव्हा कॉलेजला जात होतो, त्यावेळी सात ते आठ झोपड्या  होत्या. तो बेहरामपाडा आज चार मजली झोपड्यांचा बेहरामपाडा बनला आहे. अशाप्रकारचे बेहरामपाडे मुंबईत  निर्माण झाले. मातोश्रीच्या जवळ हा बेहरामपाडा वाढला. महापालिकेत २५ वर्षे शिवसेनेची आहे. मग त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल करत राज ठाकरे यांनी या कारवाई न झाल्याने बेहरामपाडे वाढले. मुब्य्रातही झोपड्या वाढल्या आणि झोपड्यांमधून मदरशेही वाढू लागले आहे. ईडीच्या धाडी टाकता तशा मदरशांवरही धाडी टाका. या मदरशांमधील चाललेला कारभार पाहता आपल्याला पाकिस्तानची गरज नाही. आपल्या पोटात  पाक वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.