मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाचा टेंडरमध्ये कट, इथे कट, तिथे कट, सगळीकडे कट सुरु आहे. त्यामुळे आता ईडीचीही कट लागली यांच्यामागे. स्थायी समितीची माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची दोन दिवस आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत होते. महापालिकेत मागील २५ वर्षांपासून सत्ता आहे. त्यामुळे खा खा खाल्ले, पण मुंबईचा विकास कुठे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतिर्थावील गुढीपाडव्याच्या सभेत बोलतांना केला.
यशवंत जाधवांवर टीका
मुंबई महानगरपालिकेचे कोण ते यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्सची कारवाई सुरु होती. ते मोजत काय होते? प्रत्येक पालक आपल्या मुलांना यशवंत हो,असा आशिर्वाद देतात, पण ते यशवंत जाधव हो असे आशिर्वाद देतील, अशी मार्मिक टीकाही त्यांनी केली. ही कारवाई झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात, जी काही कारवाई करायची ती माझ्यावर करा, माझ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका,याचा आधार घेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावत आधी आपल्या कु टुंबाला सांगा महापालिकेत जावू नका म्हणून.आपले नातेवाईक महापालिकेचे व्यवहार बघतात. मग ईडी मागे लागणार नाही तर काय? ही नोटीस चार महिन्यांपूर्वीची आहे. आता संपत्तीची अटकावणी झाल्यानंतर ते कुटुंबांच्या नावाने बोलू लागले आहेत,असे सांगितले.
Join Our WhatsApp Community