देशात उष्णतेच्या लाटेने उत्तर आणि मध्य भारतातील जीवनमानावर परिणाम होऊ लागला आहे. दुपारच्या प्रखर उन्हात जनजीवन विस्कळीत होण्यापर्यंत पारा वाढल्याचे चित्र दिसून येत असताना, गेले चार दिवस विदर्भातील तापमान चंद्रपूरमध्ये ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. कमाल तापमान जगभरातील पहिल्या पाच उष्ण शहरांच्या यादीत पोहोचले होते. शनिवारी मात्र चंद्रपूरातील कमाल तापमान थेट बाराव्या स्थानावर पोहोचले. शनिवारी देशभरात बार्मेरचे तापमान सर्वात जास्त होते.
जागतिक यादीत नोंदवले जातेय तापमान
पहिल्या दहा उष्ण शहरांच्या यादीत राजस्थानातील बार्मेर नवव्या तर विदर्भातील अकोला दहाव्या स्थानावर पोहोचले. बार्मेर येथे कमाल तापमान ४३.६ अंश सेल्सिअस तर अकोल्यात ४३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यानंतर चंद्रपूरातील ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाला बारावे स्थान मिळाले. मालेगावातील ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान पंधराव्या स्थानावर पोहोचेले. शनिवारी राजस्थातील एक तर राज्यातील तीन शहरे जागतिक पातळीवरील उष्ण शहरांच्या यादीत नोंदवली गेली. गेले पाच दिवस सतत विदर्भातील शहरांच्या उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ जागतिक यादीत नोंदवली जात आहे.
( हेही वाचा: …तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार! राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा )
तापमानात घट झाल्याने दिलासा
यंदाचा मार्च महिना भलताच तापल्याची नोंद होत असताना, अजून एक-दोन दिवस देशभरातील उष्णतेच्या झळा कायम राहतील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भ वगळता आता इतर भागांत कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर कोकणातील कमाल तापमान आता चाळीस अंशाखाली सरकले आहे. त्यामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आता दिलासा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community