चंद्रपूरपाठोपाठ या जिल्ह्यातही सापडले सॅटलाईटचे अवशेष

156

संपूर्ण महाराष्ट्राने शनिवारी सायंकाळी आकाशात आगीचे गोळे एकामागून एक जमिनीच्या दिशेने पडत असल्याची घटना पाहिली होती. अखेर चंद्रपूर जिल्यातील सिंदेवाडी गावात सॅटलाईटचे अवशेष मध्यरात्री सापडले. चंद्रपूरपाठोपाठ वर्ध्यातही रविवारी सॅटलाईटचे अवशेष सापडले आहेत. चंद्रपूरातील सिंदेवाडी गावात दोन लोखंडी रिंग, चेंडूच्या मध्यम आकाराचा गोळा सापडला होता. रविवारी वर्ध्यातील समुद्रपूर येथे सापडलेला भाग सॅटलाईटमधील नेमका कोणता भाग आहे, याचा उलगडा झालेला नाही. वर्ध्यातील स्थानिक अधिकारी सायंकाळी घटनास्थळी गेले होते.

अरबी समुद्राच्या दिशेने आलेल्या या आगीच्या गोळ्यांचे गूढ उकलले असून, हा उल्कावर्षाव नसून सॅटलाईटच्या बूस्टरचे तुकडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बूस्टरचे दोन मोठे रिंग आणि मध्यम चेंडूच्या आकाराचा गोळा चंद्रपूरातील सिंदेवाही गावातील नागरी वस्तीत आणि जंगलात पडले. सुदैवाने हे गोळे आदळताना कोणातीही जिवीतहानी झाली नाही.

अधिक तुकडे सापडण्याची शक्यता

शनिवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास राज्यातील विविध भागांतून आकाशात एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली. एवढे मोठे तप्त आगीचे गोळे पडणारी थरारक घटना पाहता हे गोळे नेमके कुठे जमिनीवर आदळत आहेत, याचा उलगडा होत नव्हता. शनिवारी पहाटे सिंदेवाही गावातील घराजवळील जमिनीवरील रेतीवर एक रिंग पडला. या लोखंडी रिंगचे वजन अंदाजे ५० किलो असावे. दुसरा रिंग नजीकच्या जंगलात पडला. सकाळी गावात चेंडूच्या आकाराचा गोळाही गावातील तरुणांना सापडला. या भागांना ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष आणि भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपने यांनी भेट दिली असता हे सर्व भाग सॅटलाईच्या बुस्टर भागाचे तुकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतर तुकडेही राज्यातील इतर भागांत सापडतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

element

( हेही वाचा: अरेरे! रस्त्यांवर मृतदेहांचा खच, युक्रेनची तयार झाली स्मशानभूमी )

element 1

https://twitter.com/HindusthanPostM/status/1510566595852087296?s=20&t=TWzfiRKw21vV82dZv_FXLA

कुठून आलेत सॅटलाईटचे तुकडे

शनिवारी न्यूझीलंड देशाकडून इलेक्ट्रोन रॉकेट अवकाशात प्रयाण करणार होते. रॉकेटने अवकाशात प्रयाण केल्यानंतर रॉकेटच्या बुस्टरचे तुकडे पुन्हा जमिनीवर आदळतात. हे तुकडे अरबी समुद्रात जातील अशी योजना असताना तुकडे राज्यातील विविध भागांत पडल्याची शक्यता भूगर्भ अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी व्यक्त केली.

element 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.