नाशिकजवळ पवन एक्सप्रेसला रविवारी मोठा अपघात झाला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. अपघाताचे स्वरूप पाहता हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ए-1 आणि बी-2 या बोगींचे अपघातात जास्त नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
नासिक से 20 किलोमीटर पहले पवन एक्सप्रेस पटरी से उतर गई। इस हादसे में दो यात्रियों की मौत हो गई है, जबकि 6 लोग घायल हो गए हैं। @RailMinIndia @AshwiniVaishnaw pic.twitter.com/BUuYlGsuhA
— Hindusthan Post (@HindusthanPostH) April 3, 2022
देवळाली-लहवीत दरम्यान एका वळणावर हा अपघात झाला. एक्सप्रेसचे ११ डब्बे रुळावरून खाली उतरले. या अपघातात रूळही उखडले गेले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच जखमींना जवळील शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे. रेल्वे व शासनाचे वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचत असून येथील रेल्वे वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली आहे. ही दुर्घटना मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या डाऊन मार्गावर झाली आहे.
रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
रेल्वे हेल्पलाईन क्रमांक
→सीएसएमटी- 022-22694040
→सीएसएमटी- 022-67455993
→नाशिकरोड – 0253-2465816
→भुसावळ – 02582-220167
→आपत्ती व्यवस्थापन कक्ष- 54173