लष्करप्रमुख मनोज नरवणे तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना

118

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (COAS) हे 04 ते 06 एप्रिल 2022 या तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या भेटीदरम्यान ते सिंगापूरच्या वरिष्ठ लष्करी आणि नागरी नेतृत्वाची भेट घेणार आहेत.

क्रांजी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करणार

04 एप्रिल 2022 रोजी, जनरल नरवणे क्रांजी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील. लष्करप्रमुख सिंगापूरचे संरक्षण मंत्री, सिंगापूर लष्कराचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ मान्यवरांची भेट घेऊन भारत-सिंगापूर संरक्षण संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.

इन्फो फ्यूजन सेंटर, चांगी नौदल तळालाही भेट देणार

लष्करप्रमुख इन्फंट्री गनरी टॅक्टिकल सिम्युलेशन आणि वॉरगेम सेंटर, प्रादेशिक एचएडीआर समन्वय केंद्र, इन्फो फ्यूजन सेंटर आणि चांगी नौदल तळालाही भेट देतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.