राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम १८ एप्रिल पर्यंत वाढलेला आहे. मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दाऊद गँगशी संबंधित व्यक्तीकडे जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मलिक यांची कोठडी संपल्याने त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.
मलिकांवरील आरोप काय?
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद टोळीशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मलिक यांच्या घरावर ईडीने धाड मारली होती. त्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यात आली असता त्यांना 7 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. आता 18 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याआधी न्यायालयाने मलिक यांना तुरुंगात खुर्ची, बेड आणि अंथरुण देण्यास परवानगी दिली आहे. या आधी प्रकृती बिघडल्याने मलिक यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community